Ad will apear here
Next
महाप्रस्थान
महाभारतात कौरव-पांडवांच्या महायुद्धात प्रचंड नरसंहार झाला. सत्याचा विजय झाला, तरी हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले. पांडवांना राज्य मिळाले, तरी प्रजेतील पुरुष रणांगणावर धारातीर्थी पडले. यात कोणाचा मुलगा, पती, भाऊ व अन्य सगेसोयरे होते. सर्वच जण शोकसागरात होते. पांडवांच्या घराण्यातही मोठी हानी झाली. हे सर्व विसरून नवीन साम्राज्य उभारणीला युधिष्ठिराने सुरुवात केली. धृतराष्ट्र, गांधारी हे वानप्रस्थाला निघून जातात. त्यांच्याबरोबर संजय आणि कुंतीही जातात. या दरम्यान अनेक सत्य घटनांची उकल होते. सर्व कुळाचा नाश होईल, असा शाप गांधारी श्रीकृष्णाला देते. अरण्याला लागलेल्या आगीत संजय सोडून तिघांचेही देह मृत्यूला सामोरे जातात. वानप्रस्थाश्रम म्हणजे सर्वसंगपरित्याग. असा त्याग करीत पुढे हस्तिनापूरचे सम्राट युधिष्ठिर, त्यांचे बंधू भीम, अर्जुन, नकुल, सहदेव व त्यांची पत्नी द्रौपदीही मृत्यूच्या मार्गाने जातात. पांडवांच्या या प्रस्थानाची कहाणी भास्कर जाधव यांनी ‘महाप्रस्थान’ या पुस्तकातून कथन केली आहे. 

पुस्तक : महाप्रस्थान
लेखक : भास्कर जाधव
प्रकाशन : शुभंकर पब्लिकेशन, कोल्हापूर
पृष्ठे : ६४०
मूल्य : ७४५ रुपये

(‘महाप्रस्थान’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून सवलतीत घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZXOCD
Similar Posts
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी मालिका - अंजली मुंबई : ‘झी युवा’वर २२ मेपासून सोमवार ते शुक्रवारी रात्री आठ वाजता एक नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेचे नाव आहे ‘अंजली.’ ही मालिका हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर घडते. एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अंजलीची ही गोष्ट आहे. या मालिकेत अंजलीच्या शीर्षक भूमिकेत सुरुची
‘जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध’ कोल्हापूर : ‘सामाजिक समस्यांची जाण असल्याने संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच दिल्ली दरबारात कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. बास्केट ब्रिज, रेल्वे स्टेशन, विमानतळ, कोकण रेल्वे यांसह जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे
‘अनाज इंडिया’च्या पुरस्काराने रावसाहेब पुजारी यांचा गौरव कोल्हापूर : कृषी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांचा ‘अनाज इंडिया’ या संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गांधीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुजारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘असोसिएशन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language